Gold-Price: सोन्याच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर….

सध्या भारतीय सराफा बाजाराचे ‘जहाज’ पश्चिम आशियातील घडामोडींनुसार हेलकावे खात आहे. ट्रम्प यांच्या एखाद्या विधानाने बाजाराची दिशा ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने इराणविरुद्ध घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेला घसरणीचा ट्रेंड आज, २९ मे रोजीही कायम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी आणि अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने मौल्यवान धातूंच्या किमती खाली आल्या आहेत.

बुलियन वेबसाइटनुसार भारतीय सराफा बाजारात आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा प्रति १० ग्रॅमची किंमत ४१० रुपयांनी घसरली आहे. आता एक तोळ्यासाठी १,५७,२९० रुपये मोजावे लागणार आहे. मागील एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत १.२७ टक्के इतकी घट झाली आहे. महिन्याचा विचार केला तर सोन्याच्या किमती ५.१७ टक्के चढल्या आहेत. दुसरीकडे चांदीमध्येही १२३० रुपयांची घसरण नोंदवली गेली. आठवडाभरात चांदीत १.१३ टक्के इतकी स्वस्त झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक स्तरावर सुरक्षित गुंतवणूक म्हणून अमेरिकन डॉलरला वाढती मागणी मिळत आहे, ज्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काहीशी थंडावली आहे. त्यातच अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांचा एक महत्त्वपूर्ण शांतता करार अंतिम टप्प्यात असून, त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी होणे बाकी असल्याची चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे इराणच्या सरकारी मीडियाने असा कोणताही करार अद्याप अंतिम झाला नसल्याचे म्हटले आहे. या संभ्रमामुळे गुंतवणूकदार सध्या सोने खरेदीबाबत कमालीचे सतर्क आहेत.कमोडिटी बाजारात २९ मे रोजी सकाळी देशात चांदीचा भाव २,७४,९०० रुपये प्रति किलोग्राम या पातळीवर खाली आला आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी २०२६ मध्ये देशांतर्गत बाजारात चांदीने ४ लाख रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता, तिथून आता चांदी सव्वा लाखापेक्षा जास्त स्वस्त झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles