पुणे पिंपरी चिंचवड दारूकांड, अधिकचा नफा मिळवण्यासाठी विषारी रसायन वापरले आणि १८ जणांचा मृत्यू

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांड प्रकरणाचा तपास CID वर्ग केला. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले , एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांना निलंबित करण्यात आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात 8 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आ

विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं आणि अवघ्या दोन दिवसांत तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी – दापोडीत 12 जणांचा मृत्यू झालाय तर पुण्यातील हडपसरमध्ये सहा जण मृत्युमुखी पडले. फुगेवाडीतील आणखी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

दारुच्या प्रत्येक कॅनमागे अधिकचा नफा मिळावा यासाठी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. उरळी कांचनमधे देशी दारुची भट्टी चालवणाऱ्या राधेश्याम प्रजापतीकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन एकोणीसशे रुपये या दराने दारु खरेदी करायचा. त्यानंतर ती दारु तो पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध दारु गुत्त्यांवर सत्तावीसशे रुपये प्रति कॅन या दराने विकायचा. मात्र ती दारु दुप्पट करण्यासाठी ऑनलाईन मागवलेलं मिथेनॉल मिसळायचा. ज्यामुळे दारुचे प्रमाण वाढले. मात्र ही दारु अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles