तुकाराम मुंढे यांचा बाबा रामदेव यांच्या औषध कंपनीला दणका…लाखोंचा औषध साठा जप्त

राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषध साठा जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’ व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणे हीच आमची मुख्य जबाबदारी आहे. ती आम्ही तत्परतेने व परिणामकारकरित्या पार पाडू” असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

कुठल्याही औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास न ठेवता स्वतः च्या मनाने औषधांचे सेवन करू नये. सेल्फ मेडिकेशनमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे अशा उत्पादनाबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन आयुक्तांनी केली आहे.

औषधे व जादूटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ चा भंग केल्याप्रकरणी विभागनिहाय कारवाईमध्ये नागपूरमधील मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा रु. ७,२६,७५५/- चा साठा जप्त करण्यात आला.

नाशिक

मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण रु. ७,१०,९४५/- किंमतीचा औषध साठा जप्त.

पुणे

मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण १४,६८,९८१/- किंमतीचा साठा जप्त.

बृहन्मुंबई

मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. १,८५,६००/- किमतीचा साठा जप्त.

कोकण विभाग

मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. 18,58,०००/- किमतीचा साठा जप्त.

अमरावती

मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा औषध निरीक्षकांच्या कारवाईत रु. १,४२,२२९/- किमतीचा साठा जप्त.

छत्रपती संभाजीनगर

मे. दिव्या फार्मसी, हरिद्वार (उत्तराखंड) या उत्पादकाच्या औषधांचा एकूण रु. ४८७१८/- किमतीचा साठा जप्त.

पुणे विभाग

तपासणीदरम्यान आढळलेल्या ०२ एलोपथी मिसब्रँडेड औषधांचा तब्बल रु. २१,८३,४२८/- चा साठा जप्त.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles