गेल्या महिन्याभरापासून सुरु असेलेल्या इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठे चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. आखाती देशातील या युद्धाचा थेट परिणाम आता सराफ बाजारात देखील होत आहे. अशातच सोनं आणि चांदीच्या दरात दररोज मोठे बदल होतांनाचे चित्र आहे.अशातच आज ३१ मे २०२६ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात घट झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. पण आजच्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.जर तुम्ही चांदीच्या वस्तू किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा ३० मेचा १० ग्रॅमचा भाव १ लाख ५७ हजार ०४० आहे तर तर चांदीचे दर २ लाख ८० हजार रुपये प्रती किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने १० ग्रॅम भाव – १ लाख ५७ हजार ०४० रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ८० हजार रुपये


