विधान परिषद निवडणूक: भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अहिल्यानगर, 1 जून 2026: भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार काशिनाथ दाते आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीमुळे प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीला पक्षातील वरिष्ठांचे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले.
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने प्राजक्त तनपुरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. अर्ज दाखल करतेवेळी आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधान परिषद निवडणूक ः
अहिल्यानगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधीलही बंडखोरी टळली. आता सरळ लढत अपेक्षित. प्राजक्ततनपुरे (भाजप महायुती ) आणि करण ससाणे (मात्र, अपक्ष) यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. याशिवाय कमलेश गांधी, दत्तात्रेय पानसरे व मच्छिन्द्र धुमाळ हे अपक्ष उमेदवार आहेत.
सचिन जगताप आणि राणी लंके यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. ससाणे यांनी आधीच अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. तर भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांनी आज अर्ज भरला. यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीचे त्यांचे कार्यकर्ते मात्र उपस्थितीत नव्हते


