अहिल्यानगर, 1 जून 2026: अहिल्यानगर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाट्यमय माघार घेतली आहे. खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केल्यानंतर आज पक्षाने अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी स्वतः ही माहिती दिली. ते म्हणाले, “महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळण्यासाठी राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडूनही तशा सूचना आल्या आहेत.”
यापूर्वी संदीप वर्पे यांनीच राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतच चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर राष्ट्रवादीने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरवले.
करण ससाणे यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार रिंगणात राहिला आहे.
विधान परिषद निवडणूक ः
अहिल्यानगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधीलही बंडखोरी टळली. आता सरळ लढत अपेक्षित. प्राजक्ततनपुरे (भाजप महायुती ) आणि करण ससाणे (मात्र, अपक्ष) यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. याशिवाय कमलेश गांधी, दत्तात्रेय पानसरे व मच्छिन्द्र धुमाळ हे अपक्ष उमेदवार आहेत.
सचिन जगताप आणि राणी लंके यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. ससाणे यांनी आधीच अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. तर भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांनी आज अर्ज भरला. यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीचे त्यांचे कार्यकर्ते मात्र उपस्थितीत नव्हते


