अहिल्यानगर शहरात कोयता गँग जेरबंद

अहिल्यानगर-शहरातील नागापूर परिसरातील गणेश चौक येथे हातात धारदार लोखंडी कोयते घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना 31 मे रोजी रात्री माहिती मिळाली होती. गणेश चौक, बोल्हेगाव येथे काही युवक हातात कोयते घेऊन नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे विशेष पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

पोलिसांनी छापा टाकला असता चार युवक तेथे आढळून आले. त्यापैकी तिघांच्या हातात धारदार लोखंडी कोयते होते. हे युवक नागरिकांना शिवीगाळ करून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे प्रेम नरेंद्र भाकरे (वय 23, रा. नागापूर), अभिषेक ऊर्फ भोर्‍या अरविंद भिंगारदिवे (वय 20, रा. नागापूर), बंट्या ऊर्फ प्रतिक बाबासाहेब शिंदे (वय 25, रा. नागापूर) आणि संदेश रवींद्र आंग्रे (वय 21, रा. नवनागापूर) अशी आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम भाकरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. अभिषेक ऊर्फ भोर्‍या भिंगारदिवे व प्रतिक ऊर्फ बंट्या शिंदे याच्यावरही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles