पाथर्डी तालुक्यात एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी जखमी

पाथर्डी: तालुक्यातील वृद्धेश्वर साखर कारखान्याजवळ मंगळवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास शेवगाव आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात होऊन 15 प्रवासी जखमी झाले. यामध्ये दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव आगाराची एसटी बस (एमएच 14 बीटी 4126) 52 प्रवाशांना घेऊन शेवगावहून अहिल्यानगरकडे जात होती. शेवगाव-तिसगाव मार्गावर वृद्धेश्वर कारखान्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा झाला.अपघातानंतर बसमधून डिझेल गळू लागल्याने धोका निर्माण झाला होता. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून उड्या मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर वृद्ध, महिला आणि इतर अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले. रंगनाथ चितळे, राजेंद्र तुपे, गणेश काकडे, अनिल राजळे, वृषिकेश शिरसाठ, नवनाथ तिजोरे, संतोष वाघमारे, अक्षय फुलारी, अक्षय पवार, सिमोन तिजोरी, स्वप्निल चितळे, अभिजीत शेळके, मच्छिंद्र म्हसके, पप्पू बनकर, संतोष शेळके, गणेश वेताळ, पप्पू लेंडगुळे, पवार सर, गणेश पवळे, नवनाथ पवार, संदीप काकडे यांनी बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles