अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुक ;उमेदवारांची संपत्ती जाहीर , 17 कोटींच्या मालमत्तेसह…..

अहिल्यानगर,विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय पानसरे हे 17 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांच्या जंगम-स्थावर मालमत्तेसह सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची एकूण मालमत्ता 15 कोटी 34 लाख रुपये असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

पाचही उमेदवारांनी सादर केले शपथपत्र
भाजपचे प्राजक्त तनपुरे तसेच अपक्ष उमेदवार करण ससाणे, दत्तात्रय पानसरे, कमलेश गांधी व मच्छिंद्र धुमाळ यांनी उमेदवारी अर्जासोबत संपत्तीचे विवरणपत्र निवडणूक आयोगाला सादर केले आहे.

पानसरे कुटुंबाची संपत्ती
दत्तात्रय पानसरे व पत्नी अर्चना पानसरे यांच्याकडे 9 कोटी 18 लाखांची जंगम तर 7 कोटी 88 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. विशेष म्हणजे एकूण संपत्तीपैकी जवळपास 13 कोटींची मालमत्ता पत्नी अर्चना यांच्या नावे आहे. पत्नीच्या नावे 57 लाखांच्या दोन चारचाकी, केडगाव येथे हॉटेल, तसेच घारगाव, घोटवी, बेलवंडी, केडगाव येथे शेतजमीन व सावेडी, चाहुराण्यात निवासी इमारती आहेत. पानसरे यांच्याकडे 85 ग्रॅम तर पत्नींकडे 90 ग्रॅम सोने आहे. या कुटुंबावर 3 कोटी 69 लाखांचे कर्ज आहे.

तनपुरे कुटुंब: कोट्यधीश पण गाडी नाही
प्राजक्त तनपुरे व पत्नी सोनाली यांची एकूण मालमत्ता 15 कोटी 35 लाख रुपये आहे. यात लोहगाव, पुणे येथील 5 कोटी 30 लाखांचे दोन फ्लॅट, वांबोरीत 3 कोटी 21 लाखांची 306 चौ.मी. जमीन, 200 ग्रॅम सोने व 10 लाखांची ज्वेलरी यांचा समावेश आहे. प्राजक्त शुगर व प्राजक्त टेक्स्टाइलमध्ये 93 लाखांचे शेअर्स आहेत. तनपुरेंना 9.33 एकर तर पत्नीला माहेरून 6.5 एकर वारसा जमीन मिळाली आहे. विशेष म्हणजे या कुटुंबाच्या नावे एकही चारचाकी वाहन नाही. कुटुंबावर 6 कोटी 63 लाखांचे कर्ज आहे.

इतर उमेदवार
करण ससाणे यांच्याकडे 1 कोटी 33 लाख, मच्छिंद्र धुमाळ यांच्याकडे 1 कोटी 6 लाख व 70 ग्रॅम सोने, तर कमलेश गांधी यांच्याकडे 1 कोटीची मालमत्ता व 11.5 लाखांचे कर्ज आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles