पाथर्डी पोलिसांची मोहीम: बिनापरवाना तलवार बाळगणारा ताब्यात

पाथर्डी पोलीस स्टेशनच्या अवैध हत्यार विरोधी विशेष मोहिमेत कौडगाव आठरे येथे पाण्याच्या टाकीजवळ बिनापरवाना तलवार बाळगणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीवरून छापा
दि. 2 जून रोजी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना कौडगाव आठरे येथे पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

आरोपीकडून तलवार, लोखंडी पाईप जप्त
छाप्यात बाबासाहेब शिवाजी बर्डे, वय 52 वर्षे, रा. कौडगाव आठरे यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून बेकायदा एक तलवार व चेन कवर वेल्डिंग केलेला एक लोखंडी पाईप जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे आवाहन
पाथर्डी पोलीस हद्दीत हत्यार, गावठी कट्टा अशा प्रकारची अवैध शस्त्रे कोणी बाळगत असल्यास त्याबाबत गोपनीय माहिती द्यावी, असे आवाहन पाथर्डी पोलिसांनी केले आहे.

कारवाई करणारे पथक
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोहेकॉ अल्ताप शेख, पोकाॅ ईजाज सय्यद, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर ईलंग, संजय जाधव, आप्पासाहेब तांबे यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles