संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार

मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर वारकरी भक्तांना वेध लागते ते पंढरीच्या पांडुरंगाचे, पंढरीच्या वारीची उत्सुकता आणि विठ्ठल भेटीच्या ओढीने वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे लाखो वारकरी, हजारो दिंड्या आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्या आपल्या वारीचं नियोजन करत असतात. पाऊले चालती पंढरीची वाट.. म्हणत विठ्ठल नामाचा गजर करत या पालख्यांसह हजारो वारकरी पंढरीकडे चालतात. यंदा आषाढी एकादशी 25 जुलै रोजी होत असल्याने आत्तापासूनच पंढरीच्या वारीचं नियोजन केलं जात आहे. त्यातच, संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर झालं असून यंदा 7 जुलैपासून तुकोबांची पालखी पंढरीकडे प्रस्थान करणार आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जेष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार 7 जुलै 2026 रोजी श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी संस्थानतर्फे तीन बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या यंदाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तुकोबारायांच्या पालखीसह संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचीही उत्सुकता वारकरी आणि विठ्ठलभक्तांना असते. त्यामुळे, आता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून पंढरीकडे कधी प्रस्थान होणार हेही लवकरच समजणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles