भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. गुजरातमधून राजुभाई शुक्ला, मुकेशभाई रथवा आणि मानसिंग परमार हे पक्षाचे उमेदवार असतील. मध्य प्रदेशमधून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल निवडणूक लढवणार आहेत. तर मणिपूरमधून ए.शारदा देवी, राजस्थानमधून अलका गुर्जर आणि सतिश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी राजस्थान विधानसभेत विरोधी पक्षाचे उपनेते म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे हरियाणा भाजपचे प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी आहे. जाट समाजाचे असल्याने, ते राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये सामाजिक आणि राजकीय समीकरणे संतुलित ठेवण्यात पारंगत मानले जातात. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान ते पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार करताना दिसले होते.
तर पंजाबमधून तरुण चुग यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. अमृतसरमधून येणारे तरुण चुग हे कमी वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. त्यांना पक्षाचे संकटमोचक म्हटलं जाते. तसेच त्यांची ओळख निवडणुकींचे रणनीतीकार देखील आहे.
काँग्रेसने कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि झारखंडसाठी राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने कर्नाटकातून मल्लिकार्जुन खर्गे, पवन खेरा आणि मन्सूर अली खान यांना, तर मध्य प्रदेशातून मीनाक्षी नटराजन, राजस्थानातून नीरज डांगी, तामिळनाडूतून प्रवीण चक्रवर्ती आणि झारखंडमधून प्रणव झा यांना उमेदवारी दिली आहे.पक्ष त्यांना कर्नाटक कोट्यातून राज्यसभेवर पाठवणार आहे. जेव्हा काँग्रेसने 2022 च्या 10 राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली, तेव्हा त्यात पवन खेरा यांच्या नावाचा समावेश नव्हता. ते म्हणाले होते, “कदाचित माझ्या मेहनतीत काहीतरी कमी पडले.” हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पक्षाने त्यांच्या मेहनतीचे फळ दिले आहे.
https://x.com/INCIndia/status/2062575582794359025?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2062575582794359025%7Ctwgr%5E0c1e0920dee8684c42db8d4566fc939fbb633a77%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fcongress-announces-list-of-rajya-sabha-candidates-pawan-khera-and-mallikarjun-kharge-in-the-fray-marathi-news-update-1426808


