अहिल्यानगर पोलिस दलात मोठे फेरबदल; १३७ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक अशा १३७ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या बदलीला एक वर्ष स्थगिती दिली तर काही अधिकाऱ्यांची बदली अमान्य करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. तर काही अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहेत.

अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम व संजय सोनवणे यांची अहिल्यानगरहून जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. तर, जळगाव येथून पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि उध्दव डमाळे अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आले आहेत. पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, किरण शिंदे यांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे.पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांची जळगाव येथे, आशिष शेळके यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. तर, जळगाव येथून शंकर मुटेकर व प्रदीप एकशिंगे, नाशिक ग्रामीण येथून चेतन लोखंडे आणि विकास ढोकरे अहिल्यानगर येथे बदलून आले आहेत. तर, गणेश अहिरे यांची बदली अमान्य केली आहे.पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या (कंसात बदली ठिकाण) : फराहनाज पटेल (अमान्य), चंद्रभान जाधव (नाशिक ग्रामीण), शलमोन सातपुते (अमान्य), अनंत सालगुडे, प्रियंका आठरे, रणजीत मारग, मनोज मोंढे, सचिन लिमकर (मुदतवाढ), तुषार धाकराव, उमेश पतंगे (नाशिक ग्रामीण), संदीप ढाकणे (धुळे), संपत कन्हेरे (जळगाव). तसेच पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, गणेश कुटे, किरण जगदाळे, किरण कोठुळे, किशोर जाधव, गणेश आघाव, समाधान सोळुंके, परसराम तागड, अमोल गर्जे, सुहास आव्हाड, संदीप दरवडे, विजयकुमार कोठावळे हे अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आले आहेत.विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी नाशिक परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. आता पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडूनही जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या दोन ते चार दिवसांत बदल्या केल्या जाणार असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. पोलिस ठाण्याच्या अनेक प्रभारी अधिकाऱ्यांची मुदत संपली आहे. तर, अनेकांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरल्याने त्यांची नावे बदलीच्या यादी असल्याचे समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles