पीएनजी कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी;एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल

एलपीजी कनेक्शनच्या नियमांमध्ये सरकारने मागच्या महिन्यात मोठा बदल केला. सरकार एलपीजीचे नियम आणखी कठोर करत आहे. ज्यामुळे ग्राहकांचे एलपीजी कनेक्शन कट केले जाऊ शकते. नवीन नियमांनुसार, ज्या व्यक्तींनी पीएनजी कनेक्शन घेतले आहे आणि त्यांच्या परिसरात पीएनजीचा पुरवठा सुरू आहे. असा सर्व व्यक्तींना ३० दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. एखाद्या व्यक्तीने ६ जून २०२६ ला पीएनजी कनेक्शन घेतले होते. त्यांना ६ जुलैपर्यंत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. आता एकाच पत्त्यावर एलपीजी आणि पीएनजी कनेक्शन घेता येणार नाही. केंद्र सरकारने एलपीजी सुधारणा आदेश २०२६ जारी केला आहे. या नियमानुसार, एकाच पत्त्यावर पीएनजी आणि एलपीजी कनेक्शन घेता येणार नाही.महत्वाचे म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीने पीएनजी कनेक्शन घेतले आहे. त्यांना ३० दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. त्या बदल्यात त्यांना एक एलपीजी व्हाउचर दिला जाईल. या नियमानुसार, जर ते अशा दुसऱ्या भागात राहायला गेले जिथे त्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन नाही तर त्यांना त्या व्हाउचरच्या बदल्यात एलपीजी कनेक्शन मिळू शकेल.

सध्या, एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्याचे नियम कडक झाले आहेत. ग्रामीण भागात राहणाऱ्यांना किमान ४५ दिवसांनंतर तर शहरी भागात राहणाऱ्यांना २५ दिवसांनंतर नवीन सिलिंडर बुक करता येईल. सरकारने सिलिंडर बुकिंग प्रक्रियाही अधिक कडक केली आहे. या नियमानुसार नोंदणीकृत मोबाईल नंबरशिवाय बुकिंग करता येणार नाही. नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून बुकिंग केल्यावर एक ओटीपी मिळेल. हा ओटीपी दाखवूनच तुम्हाला नवीन सिलिंडर मिळेल.घरगुती गॅस सिलिंडरचे दर बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. १ जून रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांनी वाढ करुन ते ४५ रुपये करण्यात आले. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात अनेक वेळा वाढ झाली आहे. पण तेव्हापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर राहिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles