पोलीसांना खबरी देतो म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला ;नगर शहरातील धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर – पोलीसांना खबरी देतो आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २९ वर्षीय ड्रायव्हरवर लोखंडी रॉड आणि धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ७ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोठला परिसरातील सलीम भंगारवाला याच्या दुकानासमोर समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत साजिद ताहेर शेख (वय २९, रा. घासगल्ली, कोठला) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा ७ जून रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास सलीम भंगारवाला यांच्या दुकानासमोर आला होता. त्यावेळी तिथे मस्तान चौक भागातील इरफान इकबाल शेख, अमीर सलीम शेख आणि पप्पू उर्फ खोजा शेख हे तिघे जण आले. ‘तू पोलीसांना आमच्या खबरी का देतोस?’ अशी विचारणा करत त्यांनी साजिद सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. साजिदने आपण खबरी देत नसल्याचे सांगितले, मात्र आरोपींनी त्याचे काहीही ऐकले नाही.

यानंतर आरोपी इरफान शेख याने हातातील लोखंडी रॉडने साजिदच्या जबड्यावर, कमरेवर आणि दोन्ही गुडघ्यांवर जबर मारहाण केली. त्याच वेळी दुसरा आरोपी अमीर शेख याने धारदार हत्याराने साजिदच्या उजव्या हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. तिसरा आरोपी पप्पू उर्फ खोजा शेख याने साजिदला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि ‘याच्या बापाने मला मारले आहे, याला जीवे मारून टाका’ अशी धमकी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles