आमिष दाखवत निराधार अनुदान योजनेचे पैसे लंपास ;नगर तालुक्यातील वृद्ध महिलेची फसवणूक

अहिल्यानगर – निराधार अनुदान योजनेचे (डोल) पैसे आले असल्याचे आमिष दाखवत अनोळखी व्यक्तीने 70 वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून त्यांच्या अंगावरील 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील हमाल पंचायत मार्केट यार्ड परिसरात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत द्रोपदाबाई घोलप (रा. भातोडी पारगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या काही दिवस आपल्या नातीकडे वास्तव्यास होत्या. त्या 5 जून रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या गावी जाण्यासाठी मार्केट यार्ड परिसरातील चिंचेच्या झाडाजवळ खासगी रिक्षा थांबतात त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांचे जावई ईश्वर वाघुले यांनी त्यांना रिक्षामध्ये बसवून दिल्यानंतर ते तेथून निघून गेले. याचवेळी एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्याने तुम्हाला तुमच्या मुलाने बोलावले आहे. तुमच्या डोलाचे पैसे आले आहेत, असे सांगून विश्वास संपादन केला. तसेच त्यांच्याकडे पैसे आहेत का, अशी विचारणा केली.

द्रोपदाबाईंनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या इसमाने त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून हमाल पंचायत मार्केट यार्ड परिसरात नेले. तेथे पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीने गळ्यातील पानपोत आणि कानातील फुले काढून द्या, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, असे सांगितले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे आणि संभ्रमावस्थेत असलेल्या वृद्ध महिलेला काही सुचेना. त्यामुळे त्यांनी गळ्यातील सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे पानपोत तसेच तीन ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले त्या व्यक्तीच्या ताब्यात दिली. दागिने मिळताच संबंधित भामटा दुचाकीवरून तेथून पसार झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles