राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल; एकाच दिवशी ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्राच्या प्रशासनात फेरबदल

एकाच दिवशी ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अनिता मेश्राम यांच्यासह ४ अधिकाऱ्यांची बदली

महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील ४ बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात डॉ. माधवी खोडे-चवरे आणि अनिता मेश्राम यांच्यासहित ४ अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशी सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. दोन आठवड्यापूर्वी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. मुंढे यांच्या बदलीमुळे सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज मंगळवारी महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोणाची कुठे बदली?

डॉ. माधवी खोडे-चवरे (IAS:RR:2007) अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांची नियुक्ती अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी, मंत्रालय, मुंबईत करण्यात आलीये

सुनील महिंद्रकर (IAS:SCS:2015) यांची नियुक्ती मुंबईत अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक या पदावर करण्यात आली आहे.

अनिता मेश्राम (IAS:SCS:2015), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांची नियुक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) आयुक्त म्हणून नागपुरात करण्यात आली आहे.

आदित्य जिवणे (IAS:RR:2021), संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण (MAHADISCOM), छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती जळगाव महानगरपालिका आयुक्त या पदावर करण्यात आलीये

तत्पूर्वी, मागील आठवड्यात देखील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबईसह पुणे, नाशिक, जळगाव इत्यादी भागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात राहुल रंजन महिवाल, रुचेश जयवंशी, अमित रंजन यांच्यासहित ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज मंगळवारी ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles