अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी निलंबित ;नेमकं प्रकरण काय …..

पाथर्डी -तालुक्यातील अकोले ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी भगवान भिवसेन खेडकर यांना ग्रामस्थाला मारहाण केल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी याबाबतचा आदेश १० जून रोजी जारी केला. मागील आठवड्यात अकोले ग्रामपंचायत कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली हालचाल रजिस्टरच्या नोंदीची छायांकित प्रत मागण्यासाठी आलेल्या एका ग्रामस्थाला ग्रामपंचायत अधिकारी भगवान खेडकर यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तसेच विविध वृत्तपत्र,वृत्तवाहिन्यांवरही या घटनेचे वृत्त प्रसारित झाल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक चौकशी केली. त्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियमाचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने भगवान खेडकर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अंतर्गत अधिकारांचा वापर करून भगवान खेडकर यांना ग्रामपंचायत अधिकारी पदावरून तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती अहिल्यानगर येथे निश्चित करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

तसेच निलंबनाच्या काळात त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून कोणतीही खाजगी नोकरी, व्यवसाय किंवा धंदा करता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात मोठी चर्चा रंगली होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles