अजित पवारांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही अपघात होऊ शकतो, शिंदेसेनेच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही अपघात होऊ शकतो, असा मोठा दावा शिवसेनेच्याच नेत्याने केला आहे. शिवसेनेचे माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेत त्यांना पाठिंबा दर्शवला.

एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो
रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला संबोधित करताना दत्तात्रय मगर म्हणाले, आपल्यातून अजितदादा गेले. ते कसे गेले हे सर्वांना माहीत आहे. पण इथून पुढे असा कोणताही नेता जाता कामा नये. मला सर्वांत जास्त खंत वाटते एकनाथ शिंदेंची. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही असाच घात होऊ शकतो. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे. एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा मेसेज जाऊद्या. तुमच्याबरोबरही असा घात झाल्याशिवाय राहणार नाही. ही मला खंत वाटतेय.”

सत्तेत राहूनही रोहित पवारांना पाठिंबा दिल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, सत्तेचा जुगार सुरू आहे. पत्तेच्या पानाप्रमाणे जुगार सुरू आहे. आम्ही विरोधात आहोत, म्हणून. आम्हाला मशिनने मतं दिली का? आम्ही शेण काढायचंच काम करायचं का? आम्हाला काही कामं नाहीत का? गोर गरीब जनतेची कामं करायची नाहीत का? प्रशासन चार वर्षे तुमच्या ताब्यात होतं. जनतेची सेवा करण्याची संधी जनतेने दिलीय. पण निधीच देत नाहीत. “

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles