नगर तालुक्यात तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार ; गुन्हा दाखल

अहिल्यानगर -दरेवाडी भागात एका 24 वषय तरुणीला तिचे फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय जगन बेरड (रा. हरीकृष्ण नगर, दरेवाडी, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डिसेंबर 2023 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत आरोपीने पीडितेच्या असहायतेचा गैरफायदा घेतला. आरोपी अजय याने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीला घाबरवून त्याने वेळोवेळी पीडितेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला.पीडित तरुणीने जेव्हा या प्रकाराला विरोध केला, तेव्हा आरोपीने तिला लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केली. शिवीगाळ केली. ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी अजय बेरड याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार बलात्कार, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles