नगर-पाथर्डी रोडवर हॉटेलमध्ये चाकू हल्ला; पैशाच्या वादातून तरुणाचा खून, एकजण गंभीर जखमी

नगर-पाथर्डी रस्त्यावरील बारा बाभळी परिसरातील शौर्य हॉटेलमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भिंगार येथील एका 16 वषय अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

निलेश गायकवाड याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो त्याचे मित्र सागर धोत्रे आणि निलेश चावरे यांच्यासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर निलेश चावरे याने बिल भरले आणि सर्वजण काउंटरजवळ उभे राहिले. त्याच वेळी तेथे भिंगार येथील एक अल्पवयीन मुलगा हॉटेल मॅनेजरसोबत पैशाच्या कारणावरून वाद घालत होता. हा वाद मिटवण्यासाठी सागर धोत्रे याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मित्रा कशाला वाद करतो, त्यांचे पैसे देऊन टाक, असे सागर म्हणाला. यावरून संतापलेल्या त्या अल्पवयीन मुलाने सागरला शिवीगाळ करत त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने स्वतःजवळील चाकू काढून आधी निलेश चावरे याच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तोच चाकू सागर धोत्रे याच्या छातीत खुपसला. या हल्ल्‌‍यात गंभीर जखमी झालेला सागर जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि बेशुद्ध झाला. जखमी निलेश चावरे याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सागर धोत्रे याला सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles