उद्धव ठाकरे यांचे फुटलेले खासदार हे दिल्लीहून थेट मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिंदेसेनेच्या खासदारांची एनडीएमध्ये 13 संख्या होणार असून केंद्रामध्ये एकनाथ शिंदे यांचे वजन वाढणार आहे. यामुळेच आता शिंदे गटाला 2 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामध्ये ठाकरे गटातून आलेला एक खासदार आणि एका वरिष्ठ खसदाराचे नाव असल्याचे बोलले जात आहे. पुढील काही दिवसांत मोदी सरकारमध्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे आणि यामध्ये शिवसेनेच्या वाटीला आणखी दोन मंत्रिपद येणार आहे. सध्याच्या घडीला बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहे. खासदारांची संख्या वाढल्याने आता शिंदेसेनेला लॉटरी लागणार आहे.
मागच्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, अखेर आज हे सर्व 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यामध्ये दोघांना दीड दीड वर्षे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समोर आले आहे.
संजय राऊत यांचा खासदारांवर हल्लाबोल
आज हे सर्व 6 बंडखोर खासदार मुंबईमध्ये दाखल होताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. 50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले
आणि भेदरलेल्या नजरेने
शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले
ये जिना भी क्या जिना है लल्लू?
चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे!
ह्यांची पुढील पिढी सांगेल
मेरा बाप गद्दार था
मेरा पती गद्दार था
मेरा नाना गद्दार था!
जय महाराष्ट्र
अशी पोस्ट संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केली.


