अहमदनगर मर्चंटस् को- ऑप बॅंकेच्या चेअरमनपदी संजय चोपडा यांची बिनविरोध निवड

अहिल्यानगर – अहमदनगर मर्चंटस् को- ऑप. बॅंकेच्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक संजय चोपडा यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बॅंकेच्या चेअरमनपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा मंगळवारी ( दि. ३० ) जून रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे सहाय्यक उपनिबंधक गणेश औटी याच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत चेअरमनपदासाठी ज्येष्ठ संचालक संजय चोपडा यांच्या नावाची सूचना संचालक मोहन बरमेचा यांनी मांडली. त्यास संचालक व माजी चेअरमन अनिलकुमार पोखरणा यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सहाय्यक उपनिबंधक श्री. औटी यांनी चोपडा यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नूतन चेअरमन चोपडा यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य तसेच बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

या निवडीप्रसंगी सर्वश्र्ी मावळते चेअरमन हस्तीमलजी मुनोत, विद्यमान व्हाईस चेअरमन अमित मुथा, संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय बोरा, किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, सीए मोहन बरमेचा, किशोर मुनोत, संजीव गांधी, सुभाष बायड, श्र्ीमती प्रमिलाबाई बोरा, श्र्ीमती मीनाताई मुनोत, विजयराव कोथिंबीरे, सुभाषराव भांड कर्मचारी प्रतिनिधी जितेंद्र बोरा, प्रसाद गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल बाळकृष्ण पुराणिक, जॉईंट सी. ई. ओ. नितिन भंडारी आदि उपस्थित होते.संजय चोपडा हे शहरातील प्रख्यात उद्योजक असून महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. तसेच यापुवही त्यांनी बँकेच्या चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळलेला होता.या प्रसंगी सभाध्यक्ष गणेश औटी यांनी बँकेच्या नुतन चेअरमन यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व बँकेची उत्तरोत्तर भरभराट होण्यासाठी त्यांनी बँकेस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस चेअरमन अमित मुथा संचालक, सर्वश्र्ी अनिल पोखरणा, संजीव गांधी, मीनाताई मुनोत, संजय बोरा, विजयराव कोथिंबीरे यांची भाषणे झाली.

बँकेचे नुतन चेअरमन संजय चोपडा यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, बँकेचे संस्थापक हस्तीमलजी मुनोत यांनी बँकेला ज्या प्रगतीपथावर नेले आहे. तसेच बँकेचा नावलौकिक केलेला आहे. त्या नावलौकिकास मी कुठलाही तडा न जाऊ देता बँकेच्या नावलौकिकात अधिकाधिक भर घालील. सर्व संचालकांना सोबत घेऊन बँकेची प्रगती करील. हस्तीमलजी मुनोत यांचे जे स्वप्न होते, की सभासदांना रक्कम रूपये 5,100/- ची मुदत ठेव पावतीचा मी स्वतः पाठपुरावा करून प्रस्ताव मंजूर करून हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते वितरित करण्यात येईल.बँकेचे संस्थापक व मावळते चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी आपल्या भाषणात मी बँकेच्या ज्या प्रगतीचे स्वप्न पाहिलेले आहे. त्याच प्रकारे बँकेची प्रगती होत असून नुतन चेअरमन संजय चोपडा हे चेअरमन पदाची कामगिरी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. संजय चोपडा यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles