तुकाराम मुंढेंच्या नावावर बोगसगिरी, FDA चे अधिकारी असल्याचं भासवत हॉटेलात शिरले अन्…, दोघांवर गुन्हा दाखल

तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी धडक कारवायांचं सत्र सुरू केलं आहे. मात्र, याच वातावरणाचा गैरफायदा घेणारी एक बनावट अधिकाऱ्यांची टोळी मुंबईत सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोरिवली भागात चक्क बनावट FDA अधिकारी बनून हॉटेलवर धाड टाकल्याप्रकरणी दोघांविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी थेट तुकाराम मुंढे यांचं नाव घेतलं नसलं तरी चे अधिकारी असल्याचं भासवून हॉटेल चालकाला लुटण्याचा प्रयत्न केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडे असलेल्या प्रसिद्ध ‘आहार हॉटेल’वर दोघा संशयितांनी धाड टाकली. आम्ही FDA (अन्न व औषध प्रशासन) अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी हॉटेलची तपासणी सुरू केली. हॉटेल मालकाकडे अन्न नमुने तपासण्याच्या नावाखाली त्यांनी दमदाटी करत कारवाईची थेट धमकी दिली.कारवाईची भीती दाखवत असतानाच, आरोपींनी हॉटेल मालकाला प्रभावित करण्यासाठी बनावट ओळखपत्र दाखवले. मात्र, त्यांच्या एकूण बोलण्यावरून आणि वर्तनावरून हॉटेल मालकाला संशय आला. हॉटेल मालकाने जराही वेळ न घालवता थेट पोलिसांकडे धाव घेतली.हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विजय जाधव आणि स्वाती तुळसकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles