तब्बल ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

वाशिम – पोलिस कोठडीत असताना आरोपीला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी ९ पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
सर्वच्या सर्व पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला.वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. रिसोड पोलिस ठाण्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी बेग्या पवार याचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. बेग्या पवार याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची त्याच्या आई-वडिलांची माहिती आहे. बेग्या पवार हा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा येथील पारधी समाजाचा होता. त्यांचा १० मे २०११ रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. तब्ब्ल १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला.रिसोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलिस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य, वसंत कणिराम जाधव या ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सी आय डी ने ३४ दिवस तपास करून हत्येच्या गुन्ह्यासह स्पेशल ॲट्रॉसिटीचाही गुन्हा पोलिसांवर दाखल केला होता. न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles