एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया म्हणाले….

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटात फुट पडण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडे 7 खासदार होते, परंतु शिवसेना ठाकरे गटात फुट पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. दरम्यान त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी या चर्चेला पूर्वविराम दिला आहे. देवेंद्र फडणवीस एका वृत्त वाहिनीच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागा लागतात. ज्या पक्षाकडे स्वताचे निवडून आलेले १३७ आमदार आहे, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहील की इतर पक्षाचा राहील? त्याच पक्षाचा राहणार आहे. त्यामुळे या कहाण्या स्टोऱ्या किती तयार झाल्या तरी रिअॅलिटी मला माहीत आहे. वास्तव शिंदे साहेबांना माहीत आहे. त्यामुळे अशा बातम्यांनी मी विचलित होत नाही. शिंदेही विचलित होत नाही. प्रत्येकाला वाटतं आपली स्वप्न पूर्ण व्हावीत त्यात वाईट काय आहे, अशी प्रतिक्रिया यावर फडणवीस यांनी दिली आहे, त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles