9 जुलैच्या शाळा बंद आंदोलनाला दणका; बंद ठेवणाऱ्या शिक्षकांचे वेतन कपात होणार

9 जुलैच्या शाळा बंद आंदोलनाला दणका; बंद ठेवणाऱ्या शिक्षकांचे वेतन कपात होणार – शिक्षण संचालनालयाचा आदेश

पुणे : प्रतिनिधी

राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी 9 जुलै 2026 रोजी शाळा बंद आंदोलन करणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने कडक भूमिका घेतली आहे.

शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी 7 जुलै 2026 रोजी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी आणि बृहन्मुंबईच्या शिक्षण निरिक्षकांना पत्र पाठवून स्पष्ट आदेश दिले आहेत.

पत्रात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत 9 जुलै 2026 रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच ज्या शाळा या दिवशी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हा आदेश सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यावा, अशा सूचनाही संचालनालयाने दिल्या आहेत. या पत्राची प्रत माहितीसाठी शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना देखील पाठविण्यात आली आहे.

शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने ही कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles