इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून नगर तालुक्यातील बांधकाम मजुराचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगर – इमारतीचे बांधकाम सुरू असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडून एका मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. कैलास किसन जाधव (वय ४६ वर्षे, राहणार निंबोडी, तालुका जिल्हा अहिल्यानगर) असे मृत पावलेल्या मजूराचे नाव आहे. ही घटना शहरातील नालेगांव अमरधाम परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास जाधव हे नालेगाव अमरधाम येथील इमारतीच्या बांधकामावर मजुर म्हणून काम करत होते. मंगळवारी, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी दुपारी काम करत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पहिल्या मजल्यावरून थेट सिमेंटच्या कॉंक्रिंटवर पडले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी येथील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पॅसिफिक हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी जखमीची तपासणी केली, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून कोतवाली पोलिस स्टेशनला देण्यात आली.

माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस नाईक वर्षा पंडित यांनी रुग्णालयात धाव घेऊन घटनेची प्राथमिक नोंद केली. कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार योगेश कवाष्टे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles