सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता पेन्शनमध्येही वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.म्हणजे कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. तुम्ही जर वेतनवाढीच्या एक दिवस आधी जरी निवृत्त झालात तरीही तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता पेन्शनसाठीची गणना सुरु झाली आहे.ज्या कर्मचाऱ्यांचे वर्तन चांगले असेल. संपूर्ण कार्यकाळात त्यांनी चांगले काम केले असेल तर त्यांचा या वाढीव पेन्शनसाठी विचार केला जाईल. त्यामुळे पेन्शनधारकांना खूप फायदा होणार आहे.
सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याल्या मिळणाऱ्या पेन्शनवरच कर्मचाऱ्याचे घर सुरु असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे अनेकांना फायदा होणार आहे.


