सिया गोयल प्रकरणाची देशभरात चर्चा; डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला गेलेल्या नवरा-बायकोची एक कृती झाली तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

पुण्यातील लोहगड किल्ल्याजवळ घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणानंतर सोशल मीडियावर त्या संदर्भातील मीम्स, विनोदी व्हिडीओ आणि विविध प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अशातच एका नवरा-बायकोचा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीला हा एक साधा ट्रेकिंगचा व्हिडीओ वाटतो. दोघेही डोंगर-दऱ्यांचा आनंद घेत फिरताना दिसतात. पण, शेवटच्या काही सेकंदांत कॅमेऱ्यात असं काही कैद होतं की, नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं डोंगराळ भागात फिरताना दिसतं. निसर्गरम्य परिसर, थंडगार वातावरण आणि निवांत फेरफटका… सर्व काही अगदी सामान्य असल्यासारखं वाटतं. दोघेही आनंदानं ट्रेकिंग करीत असल्याचं दिसतं.

मात्र, काही सेकंदांनी कॅमेरा अशा एका गोष्टीवर स्थिरावतो की, पाहणारेही क्षणभर थबकतात. सुरुवातीला अनेकांना नेमकं काय दिसलं, हेच समजत नाही. पण लक्षपूर्वक पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकार लक्षात येतो आणि त्यानंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस सुरू होतो.व्हिडीओच्या शेवटी कॅमेरा त्या जोडप्याच्या हातांकडे वळतो. तेव्हा दिसून येतं की, पतीनं स्वतःचा हात पत्नीच्या हाताला एका कापडानं बांधून ठेवला आहे. हे दृश्य पाहताच अनेकांनी हसत हसत विविध प्रतिक्रिया दिल्या.

काहींनी हा प्रकार केतन अग्रवाल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केलेला विनोदी टोला असल्याचं म्हटलं; तर काहींनी तो केवळ मजेशीर कंटेंट असल्याचं सांगितलं.
https://x.com/magbhu55/status/2074099404332814809?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2074099404332814809%7Ctwgr%5E709f2eb0b1ce2cb1670999a9532f962c04b8dcf3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fviral-couple-trekking-video-after-pune-case-leaves-social-media-users-surprised-with-unexpected-ending-pdb-95-6009955%2F

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles