सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष पदाविरोधात पक्षातूनच विरोध; राष्ट्रवादीच्या नेत्याकडूनच नोटीस

झारखंडमधील नेते तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाने नोटीस पाठवली आहे. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील निवड अवैध आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या नोटिशीनंतर राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या नोटिशीवर अजित पवार गाटाचे नेते उमेश पाटील यांनी सविस्तर सांगितलं आहे. सिंह यांना कोणी फूस लावलेली आहे, याचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीवर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष यांनी नोटीस दिली अशा बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र पक्षाच्या घटनेनुसार काही आक्षेप असतील तर पक्षांतर्गत विषय मांडावा लागतो. तो विषय कोर्टामार्फत दाखल करता येत नाही. तरीही त्यांनी काही नोटीस पाठवली आहे. ती नोटीस आम्हाला मिळालेली नाही, अशी माहिती उमेश पाटील यांनी दिली.राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गुपचूप झाली, असा हास्यास्पद आक्षेप त्यांनी घेतला आहे. वरळी डोम येथे एकमुखाने सुनेत्रा पवार यांची निवड झाली. निवडणूक आयोगाने याबाबत योग्य ती कायदेशीर पडताळणी करून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची मान्यता दिली. सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीला कोणताही आधार उरत नाही. तरीही सिंह यांनी घेतलेल्या प्रत्येक आक्षेपावर कायदेशीर उत्तर दिले जाईल. सच्चिदानंद सिंह यांनी पक्षात शिस्तभंग केली आहे. त्याची देखील दखल घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles