केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख समोर,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे समजते. ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची बैठक होणार आहे

येत्या १७ जुलैला केंद्रीय मंत्रीपदामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड होऊ शकते. काही नेत्यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागू शकते. त्यात शिवसेनेच्या वाटेला एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्यामुळे ज्याअर्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जाण्याची चर्चा, काल कोअर कमिटीच्या बैठकीत विनोद तावडे यांची उपस्थिती, तावडे हे एक हा मराठा चेहरा आहे आणि आजच्या दिल्लीतल्या घडामोडी त्यामुळे येत्या १७ तारखेला काय नेमकं राजकीय समीकरण बनतं हे पाहणं महत्त्वाचं राहिल.

येत्या १७ जुलैला केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदेगटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय कॅबिनेटच्या मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. आज संध्याकाळी ४ वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांसह चार्टड विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. आज रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणार आहे.

शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ठाकरेसेनेतून शिंदेसेनेत आलेल्या सहाही खासदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. या मंत्रिपदासाठी त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदरा संजय जाधव यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अशात राज्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं देखील महत्वाचे राहिल. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदेंची जी बैठक होणार आहे. यामध्ये काय होतंय ते पाहणं महत्वाचे राहिल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles