Friday, February 20, 2026

अहिल्यानगरचे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे ; राकेश ओला यांची मुंबईत उपायुक्तपदी बदली

अहिल्यानगर : जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबईत उपायुक्तपदी बदली. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे नगरचे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक. घार्गे पूर्वी श्रीरामपूरला डीवायएसपी होते. राज्यातील २१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

मुंबई : राज्यभरात पोलीस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मुंबईला तीन नवे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे आदेश गुरूवारी जारी केले.

राज्यात इतरत्र कार्यरत असलेल्या तीन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. त्यात राकेश ओला, राजतिलक रोशन व समीर शेख या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाचे उपायुक्त मंगेश शिंदे यांची नागपूर लोहमार्ग पोलीस येथे बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमनाथ घार्गे यांची पोलीस अधीक्षक (अहिल्या नगर), आंचल दलाल यांची पोलीस अधीक्षक (रायगड), महेंद्र पंडित यांची पोलीस उपायुक्त (ठाणे शहर), योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक (कोल्हापूर), बच्चन सिंह यांची समादेशक (राज्यराखीव पोलीस दल, नागपूर), अर्चिंत चांडक यांची पोलीस अधीक्षक (अकोला), बाळासाहेब पाटील यांची पोलीस अधीक्षक (नाशिक,ग्रामीण), यतीश देशमुख यांची पोलीस अधीक्षक (पालघर), सौरभ अगरवाल यांची पोलीस अधीक्षक (सीआयडी, पुणे), मोहन दहिकर यांची पोलीस अधीक्षक (सिंधुदुर्ग), विश्व पानसरे यांची समादेशक (राज्य राखीव पोलीस दल, अमरावती), निलेश तांबे यांची पोलीस अधीक्षक (बुलढाणा), तुषार दोषी यांची पोलीस अधीक्षक (सातारा), सोमय मुंडे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ (छत्रपती संभाजीनगर), जयंत मीना यांची पोलीस अधीक्षक (लातूर), नितीन बगाटे यांची पोलीस अधीक्षक (रत्नागिरी) व रितु खोकर यांची पोलीस अधीक्षक (धाराशीव) येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय संजय वाय. जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे. त्याच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles