अपहरण करून तरूणाला मारहाण ; नगर शहरातील घटना

अहिल्यानगर -बोल्हेगाव येथे तरूणाला रिक्षातून फूस लावून बोलावून घेतल्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शेतात नेऊन लाकडी दांडका, कमरेचा बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, जखमी तरूणाने फिर्याद दाखल न केल्याने तोफखाना पोलिसांनी सरकारी फिर्यादीवरून चौघांसह इतरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस अंमलदार अब्दुलकादर इनामदार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीर शेख, अमानत अन्सारी, यश शिरसाठ, चेतन सरोदे (सर्व रा. बोल्हेगाव) तसेच त्यांच्या इतर साथीदारांविरूध्द मंगळवारी (14 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 जुलै रोजी अंमलदार इनामदार यांना त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर एका मारहाणीचा व्हिडिओ प्राप्त झाला. या व्हिडिओमध्ये गोविंदपुरा येथील फैजान सय्यद यांना काहीजण लाकडी दांडका, कमरेचा बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी फैजान यांची भेट घेऊन चौकशी केली. फैजानने दिलेल्या माहितीनुसार, 24 जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते रिक्षातून भाडे घेऊन बोल्हेगाव चौकात गेले होते.

त्यावेळी ओळखीचे अमीर शेख व अमानत अन्सारी यांनी त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या दुचाकीवर बसवून बोल्हेगाव येथील सय्यद यांच्या शेतात नेले. तेथे यश शिरसाठ, चेतन सरोदे व इतर साथीदार आधीच जमले होते. यावेळी अमानत अन्सारी याने, तुझा भाऊ माझ्या बहिणीला विनाकारण मारहाण करून शिवीगाळ करतो, असा आरोप करत लाकडी दांडके, कमरेच्या बेल्टने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेबाबत जखमी फैजानने स्वतः फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात न आल्याने तोफखाना पोलिसांनी सरकारी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles