शेवगाव तालुक्यात आरोपी साईनाथ कवडेला शेअर बाजार आर्थिक फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाचा दणका

शेवगाव : तालुक्यात गाजत असलेल्या बहुचर्चित शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला मोठा धक्का बसला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायमूर्ती अमय जोशी यांनी सोमवारी (दि.13) हा आदेश दिला.

अद्वैत विनायक केदार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, साईनाथ कवडे याने त्याच्या ‘ऑटिस्टिक सोल्युशन’ या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा 12 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली. विश्वास संपादन केल्यानंतर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली; मात्र ना मुद्दल परत केले ना परतावा दिला. त्यामुळे सुमारे 9 कोटी 69 लाख 48 हजार 900 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी 28 ऑक्टोबर 2024 रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचे परीक्षण केल्यानंतर न्यायालयाने आरोपीने खोटे आश्वासन देत गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारून त्यांची फसवणूक केल्याचा प्राथमिकदर्शनी आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. तसेच पूर्वी दिलेल्या हमीचे उल्लंघन झाल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. फसवणुकीची व्याप्ती मोठी असून, अनेक गुंतवणूकदारांची रक्कम यात अडकली आहे. आरोपीने स्वीकारलेली रक्कम विविध माध्यमांतून गुंतविल्याचेही नोंदीत दिसून येत असल्याने नियमित जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने नकार दिला.

प्रकरणात फिर्यादी अद्वैत केदार यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रशांत गिरी यांनी युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड. योगेश कासुदे आणि अ‍ॅड. पवन जोंधळे यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles