Gold-Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री;जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरामध्ये आज मोठी वाढ झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७७० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेटसोबत आज २२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर आजचे २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ७७० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४३,५७० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,३५,७०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे दागिने २२ कॅरेटमध्ये तयार केले जातात त्यामुळे आज जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागेल. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३१,६०० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७००० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,१६,००० रुपये खर्च करावे लागतील.

तर, २४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५७० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०७,६७० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,७६,७०० रुपये खर्च कारवे लागतील. आज सोन्याचे दर वाढले पण चांदीचे दर स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदी २३५ रुपयांना विकली जात आहे. १ किलो चांदी २,३५,००० रुपयांना विकली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles