onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -16-07–2026 एकुण कांदा गोणी -74,215
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 2300 ते 2800
2.नंबर= 1550 ते 2300
3 नंबर= 900 ते 1550
4 नंबर= 400 ते 900
————————————————————————————————————————————————–
शाळकरी मुलीची छेडछाड भोवली; रोडरोमिओंवर पोक्सोअंतर्गत गुन्हा
पारनेर -शहरातील न्यू इंग्लिश स्कूल परिसरात शाळेतून घरी जाणाऱ्या एका 15 वषय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनाही आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनी पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असून ती मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे एसटी बसने शाळेत आली होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास ती गावाकडे जाण्यासाठी पारनेर एसटी स्थानकाच्या दिशेने पायी निघाली होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर ती आली असता, गौरव भाऊसाहेब साळुंखे (रा. मटन मार्केट, पारनेर) व विकास विलास सोनवणे (रा. रांधे, ता. पारनेर) यांनी तिचा पाठलाग सुरू केला. तुझा मोबाईल नंबर मला दे, तू मला आवडते आहेस, असे म्हणत त्यांनी तिची छेड काढली व तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने कसाबसा तेथून निघून घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीकडून घटना समजल्यानंतर तिचे वडील व इतर नातेवाईक आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, चूक मान्य करण्याऐवजी आरोपींनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.याप्रकरणी पारनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 78, 351(2), 352, 3(5) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम, 2012 मधील कलम 8, 12 व 18 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


