नगर – कल्याण रोडवर दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर – नगर – कल्याण रोडवर शिवाजीनगर परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना १२ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.संतोष लक्ष्मण चौगुले (वय ५२, सध्या रा. ढवळपुरी, ता. पारनेर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मयत संतोष यांचे पुतणे सोमनाथ रेवजी चौगुले (वय ३०, रा. ढवळपुरी, ता. पारनेर) यांनी १५ जुलै रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १२ जुलै रोजी सायंकाळी मृत संतोष चौगुले हे नगरमधील मॅकेअर हॉस्पिटल येथून आपल्या टीव्हीएस स्टार सिटी मोटरसायकलवरून (क्र. एम एच १६ ए एक्स ६३१८) ढवळपुरीकडे घरी चालले होते. ते शिवाजीनगर परिसरातील प्रगती हॉटेल समोरून जात असताना, भाळवणीकडून नगरकडे येणाऱ्या रोडवर एका अज्ञात मोटरसायकलवरील चालकाने आपले वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणाने चालवले. आणि संतोष चौगुले यांच्या मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिली.Death & Tragedy

या भीषण धडकेत संतोष चौगुले यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात चालक जखमीला मदत न करता वाहन घेऊन पळून गेला. या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १०६, २८१, १२५(अ)(ब), ३२४(२) आणि मो.वा.का. कलम १३४(अ)(ब), १८४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles