नगर तालुक्यातील देहरे रेल्वे पुलावर मारहाण करून तरूणाचे अपहरण

शिर्डी येथे दर्शन करून घरी परतणार्‍या एका तरूणाला अज्ञात सात ते आठ जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून मारहाण करत त्यांचे अपहरण केल्याची घटना देहरे (ता. अहिल्यानगर) गावाजवळील रेल्वे पुलावर घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विशाल संपत पवार (वय 35, रा. सुपा, ता. पारनेर) यांनी बुधवारी (15 जुलै) सायंकाळी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी सात ते आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विशाल पवार हे मंगळवारी (14 जुलै) रात्री शिर्डी येथे दर्शन करून आपल्या एमएच 16 सीव्ही 0171 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून घरी परतत होते. रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास देहरे गावातील रेल्वे पुलाजवळ त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत आलेल्या अज्ञात सात ते आठ जणांनी त्यांचे वाहन अडवले.

यानंतर संशयितांनी विशाल यांना वाहनातून खाली उतरवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने संशयित आरोपींच्या वाहनात बसवून सोबत घेऊन गेल्याचा आरोप विशाल यांनी केला आहे. तसेच विशाल यांच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करून नुकसान करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी विशाल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गर्जे या गुन्ह्याचा अधिक तपास आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles