नृत्यकला ही भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग मानली जाते. प्राचीन काळापासून भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचीपुडी, मणिपुरी, कथकली आणि मोहिनीयट्टम यांसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारांनी भारतीय सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आहे. तसेच प्रत्येक राज्यातील लोकनृत्ये तेथील परंपरा, सण-उत्सव आणि लोकजीवनाचे दर्शन घडवतात. नृत्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून भावभावना, भक्ती, संस्कृती आणि सामाजिक संदेश व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. आजही भारतीय परंपरेतील नृत्यकला देशासह जगभरात भारतीय संस्कृतीची ओळख जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियामुळे अनेक तरुणींना आपल्या नृत्यकलेचे प्रदर्शन करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. विविध गाण्यांवर केलेले डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकसारख्या माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे अनेक तरुणींना प्रसिद्धी मिळण्याबरोबरच कंटेंट क्रिएटर म्हणून करिअरच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. नृत्य ही केवळ मनोरंजनाची कला नसून आत्मविश्वास वाढवणारे आणि स्वतःची प्रतिभा जगासमोर मांडण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे.
दरम्यान, एक प्रसिद्धी मिळाली की अजून मिळावी यासाठी सोशल मीडियावर काही तरुण-तरुणी धोकादायक आणि जीवघेणे स्टंट करताना दिसतात. रेल्वे रुळांवर, उंच इमारतींच्या कडेला, भरधाव रस्त्यांवर किंवा नदी-धबधब्यांच्या परिसरात व्हिडिओ चित्रीत करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. काही सेकंदांच्या व्हायरल व्हिडिओसाठी केलेला असा निष्काळजीपणा गंभीर दुखापत किंवा जीवितहानीचे कारण ठरू शकतो. त्यामुळे लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सपेक्षा स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. आता व्हायरल होत असलेल्या तरूणीने देखील डान्स करता करता असाच एक स्टंट केल्याचे पाहायला मिळत आहे.सदर व्हिडीओत तरूणी कंबेरला ओढणी बांधून त्यावर पेटवलेल्या पणत्या ठेऊन नाचन्याचा प्रयत्न करतेय. यावेळी सुरूवातीला त्या पणत्या विझतात. त्यानंतर ती पुन्हा त्या लावून नाचते. ‘आंखों से तूने ये क्या कह दिया’ या गाण्यावर ती डान्स करतेय. यावेळी ती तिचे केस देखील पुढे घेऊन नाचते. चुकून दिवा केसाला किंवा कंबरेला गुंडळलेल्या ओढणीला लागला असता तर तिच्या जीवावर बेतलं असतं. परंतु या कशाचीच पर्वा न करता ती बेभान होऊन नाचत होती.


