धक्कादायक घटना, व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… वरिष्ठांचा जाचाला कंटाळून शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं;

नांदेड : शाळेतील शिक्षकांना वाढता ताण, त्यातच वरिष्ठांचा दवाब असल्याची ओरड सातत्याने होत असते. आता, व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत एका जिल्हा परिषद शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे ही घटना घडली असून या घटनेनं जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सुनील मोरे असं मृत शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलांसह आमदुरा येथील पुलावरुन थेट नदीपात्रात उडी घेतली. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

झेडपी शिक्षक सुनील मोरे यांनी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना आज सकाळी 7 ते 7.30 दरम्यान उघडकीस आली आहे. आमदुरा येथे पुलावरून त्यांची गाडी थेट नदीपात्रात पडली, त्यात दोन मुलांचाही समावेश आहे. सुनील मोरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे ही घटना उघडकीस आल्याचं सांगण्यात येत आहे. घटना काळताच गावकऱ्यांनी धाव घेत शोध घेण्यास सुरुवात केली. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर एसडीआरएफ पथकाला बोलवण्यात आले. बचाव व मदतकार्य पथकाच्या सहाय्याने बराच वेळ शोध घेतल्यानंतर नदीत पडलेल्या चार चाकीला बाहेर काढण्यात आले. सुमित मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील कोटा जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक होते, वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आपण दोन मुलांसह आत्महत्या करत असल्याचे स्टेटस त्यांनी व्हाट्सअप वर ठेवले होते. सुनील मोरे आणि त्याच्या 2 मुलांचे मृतदेहही कारमधून बाहेर काढण्यात आल्याचे माहिती एसडीआरएफ पथकाचे एपीआय सुरेश सपकाळ यांनी दिली. दरम्यान, शिक्षकाच्या आत्महत्येने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles