onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -20-07–2026 एकुण कांदा गोणी -1,08,868
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 2000 ते 2600
2.नंबर= 1300 ते 2000
3 नंबर= 700 ते 1300

4 नंबर= 400 ते 700

————————————————————————————————————————————————–

रवळगाव ता. कर्जत येथे दरोडयाचे तयारीत असलेले दरोडेखोरांची टोळी जेरबंद, टोळीतील 03 आरोपीकडुन 1,23,300/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्हयाचे अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करुन, गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना दिनांक 19/07/2026 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कोंभळी ते मिरजगाव जाणारे रोडवर काही इसम अंधारामध्ये संशयीतरीत्या गुन्हा करण्याचे उद्देशाने एकत्र जमलेले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. नमुद बातमीच्या अनुषंगाने पो.नि. संतोष मुटकुळे यांनी तात्काळ सपोनि/ हरिश भोये, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, बाळासाहेब खेडकर, सुनिल मालणकर, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, चालक चंद्रकांत कुसळकर, यांचे पथकास मिळालेल्या बातमीनुसार कारवाई करणेकामी सुचना व मार्गदर्शन होते.
वरील पथक दिनांक 19/07/2026 रोजी बातमीतील माहितीच्या अनुषंगाने तात्काळ कोंभळी ते मिरजगाव रोड दरम्यान रवळगाव गावचे अलीकडे जावन खात्री करता रोडचे कडेला तीन मोटार सायकल लावुन सहा इसम संशयीतरित्या थांबलेले दिसुन आले. तेव्हा पथकाने त्यांना ताब्यात घेणे करिता त्यांचे जवळ जात असतांना त्यांना पोलीसांची चाहुल लागल्याने ते तेथुन पळुन जावु लागले तेव्हा पथकाने तीन इसमांना ताब्यात घेतले व तीन इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) संदिप नटवर राठोड वय-32 वर्षे रा. बालाजी प्लॉट फंडवस्ती, रांजणगाव ता.शिरुर जि.पुणे, 2) आदित्य उर्फ गोला बलराम शेखावत वय-27 वर्षे रा. पानमळावस्ती, कुसेगाव ता.दौंड जि.पुणे, 3) करण भगत शेखावत वय-24 वर्षे रा. पानमळावस्ती, कुसेगाव ता.दौंड जि.पुणे असलेबाबत सांगितले, तसेच ताब्यातील संदिप नटवर राठोड यास पळुन केलेल्या इसमाची नाव व पत्ता विचारला असता त्यांने पळुन गेलेल्या इसमांची नांवे 4) मच्छिंद्र काकाभाऊ राठोड रा. पाथरगाव ता.मावळ जि.पुणे (फरार), 5) साम्यदेव मनिलाल राठोड रा. पाथरगाव ता.मावळ, जि.पुणे (फरार), 6) महेंद्र रामा राठोड, रा.कुसेगाव ता.दौंड, जि.पुणे असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांची अंगझडती घटनास्थळाची झडती घेतली असता, त्यांचे कब्जातुन 100/-रु कि.ची एक लोखमडी कटावणी, 23,000/-रु कि.चे 03 मोबाईल, 100/-रु कि.ची एक चाकु, 100/-रु कि.ची लाल मिर्ची पावड एक प्लॉस्टिक पिशवीमध्ये, 1,00,000/-रु कि.चे दोन मोटार सायकल असा एकुण 1,23,300/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यातील आरोपीकडे आणखी काही गुन्हे केले आहे काय बाबत विचारपुस करता त्यांना मिरजगाव पोलीस स्टेशन गु.र.नं.272/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4),305,324(4) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles