शेंडी बायपास, अहिल्यानगर येथे विक्री करीता आणलेले 05 गावठी कट्टयांसह 02 आरोपींकडून 10,90,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई
अहिल्यानगर : प्रतिनिधी
मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
पो.नि. श्री. संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि अनंत सालगुडे, कृष्णकुमार सेदवड यांच्या पथकाला एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीत माहिती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक 19/07/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत भाऊ आनंदा रसाळ रा. रसाळवाडी, निघोज ता. पारनेर व बंटी उर्फ स्वप्निल बिभिषण पाबळे रा. कावळ पिंपरी ता. जुन्नर जि. पुणे हे दोघे विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टे बाळगून एम.आय.डी.सी डेअरी चौक ते शेंडी बायपास जाणाऱ्या रोडवर सिलव्हर रंगाच्या कारमध्ये थांबल्याची माहिती मिळाली.
पथकाने वडगाव गुप्ता शिवारात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपी :
1) पिंटु उर्फ भाऊ आनंदा रसाळ वय-40 वर्षे रा. रसाळवाडी, निघोज, ता. पारनेर जि. अहिल्यानगर
2) बंटी उर्फ स्वप्निल बिभिषण पाबळे, वय-30 वर्षे रा. कावळ पिंपरी ता. जुन्नर जि. पुणे
झडतीमध्ये त्यांच्याकडून 2,50,000/- रु. किंमतीचे 05 गावठी पिस्टल, 40,000/- रु. चे 02 मोबाईल व 8,00,000/- रु. किंमतीची स्कोडा कंपनीची चारचाकी असा एकूण 10,90,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत भाऊ रसाळ याने शस्त्रे भैय्या उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले रा. धाराशिव याच्याकडून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तसेच दोघांनी साथीदारांसह एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. 540/2026 प्रमाणे गुन्हा केल्याचेही मान्य केले.
गुन्हेगारी रेकॉर्ड :
भाऊ रसाळ याच्यावर अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, आर्म अॅक्ट व मोक्का असे 6 गुन्हे दाखल आहेत. भैय्या भोसले याच्यावरही खुन व मोक्कासह 3 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यातील इसमांविरुद्ध पोकॉ मनोज साखरे यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 555/2026 आर्म अॅक्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.


