गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी यशस्वी चर्चा झाली नाही. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्सवर पोस्ट करत काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे.
देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्सची स्थापना करण्यात येईल. यासंबंधी संबंधित विभागांनी आवश्यक कारवाई सुनिश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकार घेत असलेल्या निर्णयांमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही दिल्लीतील जंतरमंतरवरील काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची, गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी चर्चा झाली नाही. तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आंदोलनाची कोंडी कधी फुटते हे पाहावं लागेल
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 26 वा दिवस आहे. ते गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आहेत. तर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची सशर्त तयारी दर्शवली आहे. सरकारला पत्र लिहून त्यांनी आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. तर आंदोलकांवर दंड ठोठावणार नाही अशी हमी द्या, सरकारने हमी दिली तर उपोषण थांबवतो असं वांगचुक म्हणाले. सरकारनं हमी न दिल्यास उपोषण थांबवणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई, संसदेत चर्चा करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यावर विचार व्हावा, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये, या वांगचुक यांच्या मागण्या आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करणाऱ्या वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्ती रुग्णालयात दाखल केलेलं.. त्यांनी आता रुग्णालयातून आपलं उपोषण सुरु ठेवलंय. नीट पेपरफुटी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या मागण्यांसाठी ते 26 दिवस झाले उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषण सोडावं अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.


