नगर शहरात शाळकरी मुलीचा पाठलाग करून धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

शाळकरी मुलीचा पाठलाग करून धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल
अहिल्यानगर – ​अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चौदा वर्षीय शाळकरी मुलीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवून तिचा सतत पाठलाग करणाऱ्या एका तरुणाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ मे ते २१ जुलै दरम्यान घडली असून, या प्रकरणी २२ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने अल्पवयीन मुलीच्या आईच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील व लज्जास्पद संदेश पाठवले. इतकेच नव्हे तर, ती मुलगी शाळेत जात असताना तो सातत्याने तिचा पाठलाग करत होता. मुलीच्या कुटुंबाने या त्रासाबाबत जाब विचारला असता, संशयिताने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. “मी सहा महिने जेलमध्ये जाऊन येईन, तुम्हाला काय करायचे ते करा, मी कोणाला घाबरत नाही,” अशी धमकी देऊन त्याने कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.

​सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक करत असून, पोलीस सध्या घटनास्थळाचा पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles