onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -23-07–2026 एकुण कांदा गोणी -1,00,141
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 2000 ते 2650
2.नंबर= 1350 ते 2000
3 नंबर= 800 ते 1350
4 नंबर= 400 ते 800
————————————————————————————————————————————————–
कुऱ्हाडीने हल्ला करून सोन्याचे मनी मंगळसूत्र लांबवले; देऊळगावसिद्धीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर : तालुक्यातील देऊळगावसिद्धी येथे पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांनी गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र तोडून पळ काढला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगावसिद्धी परिसरामध्ये १८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. श्रीमंत जीवलाल चव्हाण आणि अनिता श्रीमंत चव्हाण (दोघे रा. देऊळगावसिद्धी) यांनी जुन्या वादातून अनिता भोसले यांच्या घरासमोर जाऊन वाद घातला. वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन आरोपींनी कुऱ्हाडीने थेट डोक्यात वार केले. या हल्ल्यात अनिता भोसले आणि त्यांचा मुलगा संकेत भोसले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ल्यादरम्यान आरोपींनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून नेले. या घटनेनंतर परिसरात मोठा खळबळ उडाली आहे. जखमींवर उपचार केल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गुंजाळ करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.


