मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग ; संताप आणणारा व्हिडिओ समोर

नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. मात्र व्यवस्थेविरोधात आपला असंतोष मांडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या या तरुणांसोबत काही पोलीस कर्मचारी संतापजनक कृत्य करत असल्याचं समोर आलं आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. दादर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान तरुणीला एका व्यक्तीने चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तरुणीचा विनयभंग करणारा व्यक्ती पोलीस दलात कार्यरत असल्याचं सांगितलं जात असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांत दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची आणि मोर्चाची धग राज्यभरात पाहायला मिळाली, दिल्लीसह महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी, तरूण-तरूणींनी विविध पक्षांनी आंदोलने केली, मोर्चे काढल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनावेळी घडलेल्या अनेक घटनांचे व्हिडीओ फोटो सोशल मिडीयावरती व्हायरल झाले आहेत. यामध्ये पोलिस तरूणांना धमक्या देताना त्याचबरोबर मुली, तरूणी, महिला यांच्यासोबत अश्लील वर्तन करताना, नको तसं खेचून मारहाण करताना आणि बँड टच करत असतानाचे व्हिडीओ दिल्लीसह मुंबईतूनही समोर आले, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह काही नेत्यांनी सोशल मिडीयावरती एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, या व्हिडीओमध्ये एक पोलिस तरूणीला विचित्र प्रकारे पकडून खेचताना दिसत आहे, या व्हिडीओसोबतच रोहित पवारांनी संतापजनक पोस्ट देखील लिहली आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/2080333485219463462?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2080333485219463462%7Ctwgr%5E63f2ae3ac1a2491ea5e635f39b2e22a7ac1ebd55%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fmumbai-police-shocking-act-with-protester-girl-demands-for-strict-action%2Farticleshow%2F132596462.cms

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles