टीईटी पेपरफुटीतील मुख्य आरोपी अटक, दीड कोटींना विकली गेली प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत २८ जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (टीईटी) या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला ठाणे पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. महिन्याभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुप्ताला अखेर पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी गुप्ताला पुणे विमानतळावर आणले असून पुढील तपासासाठी त्याला लवकरच भिवंडीला नेण्यात येणार आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात गुप्ताची पत्नी सुमन गुप्ता यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटीच्या साखळीचे काम सुरळीत करण्यासाठी सुमन गुप्ताने भूमिका बजावली असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामुळे तिच्या सहभागाची चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार, दिनांक २८ जून रोजी राज्यभरातील १०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना केल्या होत्या. मात्र तरीही पेपरफुटीची घटना घडली.
https://x.com/ians_india/status/2080860910655336573?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2080860910655336573%7Ctwgr%5Ef93519f09d2915081f6a4c3ba3d126d392f73277%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fprime-accused-in-maharashtra-tet-paper-leak-case-bijendra-gupta-arrested-in-bihar-kvg-85-6039784%2F
दीड कोटींना विकली गेली प्रश्नपत्रिका

टीईटीचे पेपर फुटल्यानंतर भिवंडी येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकाराचा माहिती दिली. टीईटी परीक्षेचा पेपर तब्बल दीड कोटी रुपयांना विकला जाणार होता, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. तसेच या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना भिवंडीतील कोनगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले होते.

अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक आरोपी हरियाणाचा तर दोन आरोपी बिहारचे रहिवासी आहेत. हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. या कारवाईदरम्यान संशयितांकडून प्रश्नपत्रिकेशी संबंधित कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळाली, ती कोणाकडून आरोपींपर्यंत पोहोचली आणि ती नेमकी कोणाला विकली जाणार होती, याचा सध्या सखोल तपास सुरू असल्याचे दुधे यांनी सांगितले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles