’50 ग्रॅम पावडर टाकण्याची’ धमकी देणाऱ्या त्या पोलीस काकांना निलंबित करू नका ; तरुणाची ‘दुसरी बाजू’ समोर , व्हिडीओ

“खिशात ५० ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी देणाऱ्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या पोलिस कर्मचाऱ्यावरती कारवाई देखील करण्यात आली, मात्र, आता या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. त्याच पोलिसांच्या गाडीत बसलेल्या तीन तरुणांपैकी एका तरुणाने पुढे येत या घटनेची ‘दुसरी बाजू’ समोर आणली आहे. “ते पोलीस काका वाटतात तितके वाईट नव्हते, त्यामुळे त्यांना जास्त काळासाठी निलंबित (सस्पेंड) करू नका,” अशी विनंती या तरुणाने मुंबई पोलीस प्रशासनाला केली आहे व्हिडीओच्या सुरुवातीला या तरुणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे विशेष आभार मानले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी हस्तक्षेप करत पोलिसांशी चर्चा केली व विद्यार्थ्यांना सोडवून आणले. मनसेच्या या मध्यस्थीबद्दल तरुणाने त्यांचे मनापासून धन्यवाद मानले.

“एक कालपासून ना व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय आणि या व्हिडीओमध्ये जो मुलगा आहे… ज्या गाडीत आहे… पाठीला जो मुलगा आहे, तो मीच आहे. आणि मला या विषयावरती काहीतरी बोलायचं होतं, म्हणून मी आता व्हिडीओ बनवतोय. फर्स्ट ऑफ ऑल, राज साहेब, उद्धव साहेब, अमित दादा, आदित्य दादा… थँक्स अ लॉट! तुम्ही त्या प्रोटेस्टरांना तुमच्या घरासमोर प्रोटेस्ट करायची जी परवानगी दिलात त्याबद्दल. आणि राज साहेब, तुम्ही तो विषय प्रेसमध्ये मांडलात… तो प्रचंड व्हायरल झाला, त्यासाठी पण थँक्स! त्यानंतर पोलिसांवरती जी कारवाई झाली, ती बरोबर झाली. झाली पण पाहिजे. आता पोलिसांमध्ये पण एक शिस्त असेन… कसं… पण आतापर्यंत हे ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायचीय की, प्रत्येक गोष्ट अशी ब्लॅक अँड व्हाईट नसते. मला असं सांगायचंय की मी त्या गाडीत होतो. ते काका मनाने खूप चांगले होते. आम्ही त्यांना बोललो की, ‘काका, गाडीत गरम होतंय, तुम्ही एसी लावा’, तर त्यांनी एसी सुद्धा लावली.


आम्हाला बोर होत होतं, म्हणून त्यांनी गाणी वाजवली… त्यांनी गाणी सुद्धा प्ले केली. आणि शेवटी त्यांनी सोडल्यानंतर पण आम्हाला हेच बोलले की, ‘ते बघा तुमचे प्रोटेस्टर तिथे प्रोटेस्ट करतायत, जाऊन त्यांना जॉईन करा.’ तर मला मुंबई पोलीसला हेच सांगायचंय की, त्यांना जास्त टायमासाठी सस्पेंड करू नका. कारण आता मुंबईत गणपतींचा आगमन होणार आहे, तेव्हा खूप गर्दी होते आणि सगळ्यांनाच माहिती आहे मुंबई पोलीसची किती हेल्प होते आपल्या सगळ्यांना त्या टायमिंगला. तर तेव्हा त्यांची गरजसुद्धा लागेल. हाच माझा मेसेज आहे मुंबई पोलीससाठी.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles