मनपा वैदयकीय आरोग्य अधिकारी पदावर पुर्ववत रुजू करुन घ्यावे
डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र
अहिल्यानगर प्रतिनिधी : 1)महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ४५, कलम ५८, २)जा.क्र. आस्थापना १०७ दि.०७/०१/२०२५ चे सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश,३) जा.क्र. आस्थापना दि. १६/०१/२०२५ चे त्रिसदस्यीय समिती नेमणुकीचे आदेश
४) त्रिसदस्यीय समितीने दि. ३१/०१/२०२५ रोजी दिलेला अहवाल.
५) दि.०४/०२/२०२५ रोजीचे कारणे दाखवा नोटीस
६) जा.क्र. आस्थापना ६७६ दि.२१/०२/२०२५ चे निलंबन आदेश.
७) जा.क्र. आस्थापना ११८८ दि.०१/०४/२०२५ चे निर्वाह भत्याबाबतचे पत्र.
८) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. निप्रआ-११२२/प्र.क्र.०९/ विचौ-२ मंत्रालय मुंबई यांचे दि.२२ एप्रिल २०२५ रोजीचा शासन निर्णय.
९) मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर शहर विभाग, अहिल्यानगर यांचे जा.क्र. शवि/गुन्हे १३९३/२०२५ दि.२९/०३/२०२५ रोजीचे पत्र. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास निवेदित करण्यात येते की, ज्याअर्थी संदर्भ क्र.१ अन्वये माझी नेमणुक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५ नुसार करण्यात आली आहे. ज्या अर्थी कलम ५८ अन्वये १ महिन्यापेक्षा अधिक काळ सक्तिच्या रजेवर ठेवणे करीता मा. शासनाच्या पुर्व परवानगी शिवाय मला सक्तिच्या रजेवर पाठविण्यात आले. ज्याअर्थी संदर्भ क्र.२ चा आदेश हा शासनाच्या पुर्व परवानगी शिवाय व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे उल्लंघन करुन काढलेला आहे. ज्याअर्थी आरोग्य विभागाच्या रॅकींगमध्ये २६ क्रमांकाहुन १६ व्या क्रमांकापर्यंत माहे. जानेवारी २०२५ अखेर प्रगती झालेली आहे. ज्याअर्थी माझ्या अपरोक्ष व मला कुठलीही संधी न देता संदर्भ क्र.३ अन्वये नेमलेल्या समितीने अर्धवट कागदपत्रांच्या आधारे अहवाल तयार करुन व तसे अहवालात नमुद करुन बोगस व तपासणीवावतचे नियम डावलून बोगस अहवाल तयार केलेला आहे. ज्याअर्थी अपूर्ण व अर्धवट कागदपत्रांच्या अहवालाचा आधार घेऊन मला संदर्भ क्र.५ अन्वये कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. ज्याअर्थी बोगस अहवालाच्या आधारे माझेवर महानगरपालिके तर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्याअर्थी संदर्भ क्र.६ अन्वये माझे निलंबन करण्यात आलेले आहे. ज्याअर्थी संदर्भ क्र.७ अन्वये निर्वाह भत्ता संदर्भात मला पत्र दिलेले आहे. ज्याअर्थी उपरोक्त बोगस व अर्धवट कागदपत्रांच्या व त्रिसदस्यांचे अहवाल व साक्षी घेऊन व प्रकरणाची संपूर्ण शहानिशाकरुन संदर्भ क्र.९ अन्वये कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्र. १८८/२०२५ मधुन मी निर्दोष असल्याने माझे नाव वगळण्यात आलेले आहे. ज्याअर्थी संदर्भ क्र. ८ च्या शासन निर्णय अन्वये माझे निलंबन आपोआप संपुष्टात आलेले आहे. त्याअर्थी खालील प्रमाणे तात्काळ कार्यवाही होणेस विनंती आहे.
१) मला माझा धारणाधिकार प्राप्त असणा-या वैदयकीय आरोग्य अधिकारी या पदावर संपुर्ण सन्मानाने तात्काळ रुजु करुन घेण्यात यावे.
२) निलंबन कालावधीतील सर्व वेतन, भत्ते तात्काळ अदा करण्यात यावे.
३) त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल हा अर्धवट असलेबाबत त्रिसदस्यीय समितीने अस्विकृती प्रमाणपत्राच्या सुरुवातीला नमुद केल्या प्रमाणे अपूर्ण कागदपत्रे व तपासणीच्या मा. शासनाच्या एस.ओ.पी.चे पालन झालेले नसल्याने सादर करणा-या अधिकारी कर्मचा-यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व सदरचा अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मनपा आरोग्य अधिकारी या पदावर रुजू करून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली


